पत्नीच्या प्रेम प्रकरणाचा संशय बळावला..! पतीने मित्रांच्या मदतीने मारहाण केलेल्या श्रीगोंद्यातील युवकाची नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या..!

दिनांक २९ मार्च २०२४, शिरूर/श्रीगोंदा:

शिरुर शहरातील बाबुरावनगर येथील विशाल शिंदे (वय २१) मुळ (रा.विसापुर ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर) या युवकाला एका महीलेच्या पतीने प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन मित्रांच्या मदतीने मारहाण करुन दमदाटी केल्याने, नैराश्यातुन विशाल शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शिरूर पोलीसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या दरम्यान विशाल नवनाथ शिंदे याचे शिरुर येथील एका नर्स सोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरुन तिचा पती हा त्याच्यासोबत मदने, घोंगडे तसेच इतर २ ते ३ अनोळखी साथीदारांना सोबत घेऊन मयत विशाल शिंदे याला तो काम करत असलेल्या लॅबजवळ शिरुर, येथुन शनिमंदिराजवळ, लाटे आळी, शिरुर येथे घेऊन गेला. त्यानंतर विशालला या सर्वांनी मारहाण दमदाटी केली.

त्यांच्या त्रासाला कंटाळून विशाल शिंदे याने त्याच्या कृष्णई विहार, बाबुराव नगर, शिरुर येथील राहत्या घरामध्ये किचन रुममधील सिलींगला असलेल्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये महीलेचा पती व त्याचे साथीदार मदने,  घोंगडे व इतर २ ते ३ अनोळखींविरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading