आढळगाव येथे पं. ज. नेहरू विद्यालयात शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न..

दिनांक ३० मार्च २०२४ (श्रीगोंदा).. (प्रतिनिधी जावेद इनामदार):

तालुक्यातील आढळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे वरिष्ठ लिपिक श्री तुकाराम दादाराम बोळगे तसेच उपशिक्षक श्री भाऊसाहेब आबासाहेब सुद्रिक या शिक्षकांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून पार पडला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुभाषलाल गांधी होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी श्री. तुकाराम कन्हेरकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजीराव तापकीर व कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काकासाहेब तापकीर उपस्थित होते.

यावेळी बी. आर. एस. चे नेते घनश्याम शेलार, जि. प. सदस्य अनिल ठवाळ, प. स. मा. सदस्य राजेंद्र मस्के, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन शरद जमदाडे या वक्त्यांनी शुभेच्छा पर भाषण करताना या दोन्ही शिक्षकांनी आपल्या ३० वर्षाच्या सेवेत चांगले काम केले असल्याचे सांगून, त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा जीवनपट समोर मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला व या दोन्ही शिक्षकांना पुढील भविष्य काळासाठी उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.

तुकाराम बोळगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी वरिष्ठ लिपिक म्हणून, संस्थेमध्ये काम करत होतो. मला शाळेविषयी खूप आदर व आपुलकी आहे. म्हणून, यातून उतराई होत असताना मी या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून, १४ ते १५ हजार लिटर पाण्याची टाकी आरसीसी मध्ये बांधून देणार, असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाऊसाहेब सुद्रिक सर यांनी विद्यालयासाठी ५१ हजार रु. मदत म्हणून देण्याचे या कार्यक्रमात जाहीर केले.

कार्यक्रमासाठी सरपंच शिवप्रसाद उबाळे, उपसरपंच अनुराधाताई ठवाळ, चेअरमन दादासाहेब गव्हाणे, नानाभाऊ बोळगे, मा. सभापती विलासराव भैलुमे, ग्रा. प. सदस्य उत्तम राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, जालिंदर बोडखे, पत्रकार शरद शिंदे, पत्रकर अमर छत्तिशे, पत्रकार सचिन शिंदे, रमाभाई इनामदार, राहुल राऊत, शिंदे गुरुजी, देवराव शिंदे, जिजाराम डोके, ज्ञानेश्वर डांळिबे, यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य व सेवा संस्थेचे संचालक तसेच श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील सर्व आजी माजी रयत सेवक, ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ व मान्यवरांसाठी बोळगे व सुद्रिक सर यांनी स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर यांनी केले.. तर, सूत्रसंचालन काळे बी.बी. सर व सौ.खेंडके मॅडम यांनी केले व सर्वात शेवटी शेळके व्ही. के. यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading