दिनांक ७ मार्च २०२४, श्रीगोंदा:
गणेश घोडके यांनी श्रीगोंदा नगर पालिका प्रशासनाच्या दारात दिनांक ४ मार्च रोजी सुरु केलेले आमरण उपोषण आज ७ मार्च रोजी संध्याकाळी ५:०० वाजनेच्या सुमारास तात्पुरते स्थगित करण्यात आले. लेंडी नाला सुशोभिकरनाच्या कामांत चाललेला अनागोंदी कारभार गणेश बाळासाहेब घोडके यांची म्हैस नाल्यातील चेंबर मध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर पिडित व्यक्तिसह वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया पँथर सेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्या नंतर समोरं आला.
पिडीताची म्हैस नाल्यातील चेंबर मध्ये पडल्यानंतर ठेकेदार वैभव माने यांनी तिचा वैद्यकीय पंचनामा न करता मयत जनावर पुरून टाकल्याने. पिडीताने पुरोगामी संघटनांच्या मदतीने नमूद ठेकेदार माने हे या प्रकरणात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत दुर्घटनेस जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केला. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात व नगरपालिकेत तक्रारी अर्ज सादर केला. मात्र, पाठपुरावा करून गणेश घोडके यांच्या नुकसानभरपाईसाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक प्रशासन घोडकेंच्या विरोधात भुमिका मांडत असल्याने संघटनांच्या माध्यमांतून दिनांक ४ मार्च रोजी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. व आंदोलन चालु करण्यात आले.
सलग चार दिवस चाललेल्या आंदोलनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी सफसेलं दुर्लक्ष्य करीत आंदोलन स्थळी येण्याची तयारी दाखवली नाही. संतप्त आंदोलकांनी आंदोलनाची तीव्रता वाढवत ढोलताशा वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तरीही, पालिका प्रशासनाच्या वतीने कोणतेही ठोस आश्वासन घोडकेंना मिळाले नाही.
यानंतर ठेकेदार वैभव माने वर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या चळवळीतील पदाधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देतं पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी आंदोलकांना टाळले. या प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी उपस्थित अंमलदार मुकेश कुमार बडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरं मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. याठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोरं पोलीस अधिकारी आणि त्या तळीराम बडेचा निषेध करून यंत्रणेचा चांगलाच समाचार घेतला.
आंदोलनात सहभागी पदाधिकारी निलेश गायकवाड, (युवा जिल्हा अध्यक्ष, वंचित), अमर घोडके, (जिल्हा उपाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना), सचिन घोडके, (जिल्हा उपाध्यक्ष वंचित), भिमा घोडके, (पदाधिकारी वंचित), नितिन जावळे, (सामाजिक कार्यकर्ते) यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांच्या सलग्न यंत्रणेचा निषेध केला. यावेळी शहरातील निकृष्ट कामं, अवैध्य धंद्यासह आंदोलनाकडे पाठ फिरवनाऱ्या नगरसेवक, पदाधिकारी आणि प्रशासनाचा निषेध केला.
आज संध्याकाळी काही सामाजिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी साधलेल्या समन्वयानंतर आंदोलन स्थळी मुख्याधिकारी भगत मॅडम व त्यांचे प्रशासकिय अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पिडित गणेश घोडके व वंचित बहुजन आघाडी सह AIPS च्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भगत मॅडम यांनी आंदोलनातील सर्व मागण्याची पूर्तता करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. तपास झाल्यानंतर घोडके यांना प्रशासन नुकसानभरपाई देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आंदोलनास घनःश्याम शेलार (राज्य समन्वयक BRS), अनिल ठवाळ (जिप सदस्य), वसंत सकट (राज्य उपाध्यक्ष, बहुजन समता पार्टी), मुकुंद सोनटक्के (सामाजिक कार्यकर्ते), जीवा घोडके (सामाजिक कार्यकर्ता), राम घोडके (सरपंच) सह विवीध सामाजिक, राजकीय संघटनाचे पदाधिकाऱ्यानी भेट देऊन पाठिंबा दिला.
यावेळी विक्रम पाचपुते (भाजपा), निलेश गायकवाड, अमर घोडके, बाळासाहेब दुतारे, सुरेश बाबा देशमुख, सचिन घोडके, भीमा घोडके, सचिन शिंदे, प्रसाद भिवसणे, अतुल देशमाने, राजू कोथंबिरे, दिपक घोडके, जहिर जकाते, सतिश बोरुडे, राजेन्द्र उकांडे, सुनिल वाळके, नाना कोथंबिरे, कांतिलाल कोकाटे, बाळासाहेब घोडके सह पालिका, अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्थानिक सामाजिक/राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. गणेश घोडके यांना लेखी आश्वासन व फळाचा रस देऊन आंदोलन संपन्न झाले.
स्रोत:(आंदोलन)
