बारामतीकराकडून श्रीगोंदेकरांना संक्रमण झाले की नाही ? NIV च्या अहवालात होणार स्पष्ट.

दिनांक ३० मार्च, श्रीगोंदा:

बारामती मधील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातले तीन जण आले होते.या तीन व्यक्ति संदर्भात आज रोजी दिवसभर मोठी चर्चा रंगल्याचे समोर आले.सामाजिक माध्यमांतून संक्रमित व्यक्तीचे फोटो टाकत,फोटोला सर्कल करून त्याचे नाव सार्वत्रिक करीत या प्रकरणी नेटकऱ्यांमध्ये चर्चेला मोठे उधाण आल्याचे दिसून आले.आत्ता कोरोना तालुक्यात पोहचला आहे., सर्वांनी सावधान!!,आत्ता तरी जागे व्हा!घराबाहेर पडू नका.व्हायचे तेच झाले,बरं झालं आत्ता तरी जागेवर येतील घराबाहेर पडणारे.अश्या पद्धतीने सोसियल मीडियावर चर्चा व्हायरल झाली.

नमूद प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, बारामती कराच्या संपर्कात आलेल्या “त्या”? तीन संशयित इसमांची नगर येथील सिव्हिल रुग्णालयात आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.तशेच,त्यांच्या घशातील स्त्राव नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे समजते आहे.

सविस्तर असे की,दिनांक २० मार्च रोजी नमूद तीनही व्यक्ती शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ‘या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी या विषयी सांगितले की, कोरोना संक्रमित व्यक्तीच्या हे तिघे संपर्कात आले होते.तिघांची वैद्यकीय तपासणी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात करण्यात आली असून, यानंतर येणाऱ्या अहवाला नुसार ते कोरोनाबाधित आहेत किंवा नाहीत हे समजेल.साधारण NIV चा तपासणी अहवाल येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल. लोकडाऊनच्या काळातील लोकांचा निष्काळजीपणा योग्य नाही. आपल्या ग्रामीण भागात कोरोना येऊ शकत नाही.अशा अविर्भावात काही मंडळी रस्त्यावरून फिरत आहेत. प्रशासन वारंवार सूचना करीत असतांना लोक बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading