दिनांक २४ जानेवारी २०२६ , श्रीगोंदा:
पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूरमध्ये केलेल्या कारवाईत १० कोटी रुपयांचा अल्प्राझोलम हा अमली पदार्थ जप्त केला असून, यामध्ये अहिल्यानगर अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर याचा मुख्य सहभाग उघड झाला आहे.
शिरूरमधील गॅरेजचालक शादाब शेख याच्याकडून सुरुवातीला अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. तपासात या गुन्ह्याचे धागेदोरे थेट पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचले.

मे २०२५ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसीत जप्त केलेला १३ कोटींचा साठा शामसुंदर गुजर याने चोरून परस्पर विक्रीसाठी काढला होता.
शादाब शेख, शामसुंदर गुजर, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड (रा. श्रीगोंदा) आणि ज्ञानदेव शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटी रुपये किंमत असलेला १० किलो ७०० ग्रॅम अल्प्राझोलम, कार आणि दुचाकी आरोपींनी हा अमली साठा शेतात आणि गोठ्यात लपवून ठेवला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
