दिनांक १३ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अनेक सामाजिक संघटनांसह सामाजिक प्रक्रियेत सक्रिय असणाऱ्यांनी रक्ताचा पुरवठा कमी पडू नये, या उद्देशाने रक्तदान शिबीरं राबवली आहेत. अश्याच उद्देशाने प्रेरित होऊन ग्रामउन्नती सेवाभावी संस्था, अधोरेवाडी व साई हॉस्पिटल, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रम प्रसंगी श्रीगोंदा नगरपालिकेचे (उपनगराध्यक्ष) रमेश लाडाने, नगरपालिकेचे (नगरसेवक) अंबादास औटी, अनिल महाराज औटी, (माजी नगराध्यक्ष) भागचंद घोडके, अशोक ढवळे, मच्छिंद्र काळे, गोरक्ष लकडे व ग्रामउन्नती सेवाभावी संस्थेचे (अध्यक्ष) रामदास धनाजी गव्हाणे, (उपाध्यक्ष) मनोहर दिगंबर ढवळे व इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
दिवसेंदिवस रक्ताची भासणारी कमतरता, गरजू रुग्णांचे होणारे हाल, रक्तदानाची समाजात वाढणारी भीती कमी करणे या प्रमुख उद्देशाने ग्रामउन्नती सेवाभावी संस्था व साई हॉस्पिटल श्रीगोंदा यांनी जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या सहाय्याने हा उपक्रम पार पाडला.

स्त्रोत:(अनिल महाराज औटी यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
