तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्ता निवृत्ती शेलार असे या आरोपीचे नाव आहे.सदर घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून,अश्या घटनांत तालुक्या सह पंचक्रोशीतील वाढ होतांना दिसत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला आरोपी शेलार याने घराच्या पाठीमागे नेऊन बळजबरीने तिचे अंतर्वस्त्रे काढण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी,पीडितेने मोठ्याने आरडा ओरड केली. किंचाळलेल्या आवाज तिच्या आईने ऐकला आणि तिने तिकडे धाव घेतली. याप्रसंगी,आरोपी दत्ता निवृत्ती शेलार हा त्या अल्पवयीन मुलीच्या हाताला पकडून ठेवले होते.
मुलीने आईला पाहताच आईकडे धाव घेतली यावेळी आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला. पीडित मुलगी बराच वेळ रडत होती.तिला काही वेळानंतर विश्वसात घेऊन,आई वडील यांनी विचारणा केली असता,तिने आरोपी दत्ता निवृत्ती शेलार हा घराच्या मागे नेऊन माझे अंतर्वस्त्रे काढत होता, अशी माहिती सांगितले. यानंतर आई वडीलांनी मुलीला घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. पीडितेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंग याच्यासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी शेलार याला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केले आहे.