बस व मोटार सायकलच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू.
01 mins
बस व मोटार सायकलच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू.
दिनांक १७ फेब्रुवारी,गव्हाणवाडी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी स्थित नगर पुणे महामार्गावर लक्झरी बस आणि मोटरसायकल धडकेत झालेल्या अपघात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील ड्रायव्हरला अटक करीत बस ताब्यात घेण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एम.के.कोळपे हे करत आहेत.या घटनेतील आरोपी सह लक्झरी बस बेलवंडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
ऋषिकेश सुदाम झरेकर, वय २५ वर्ष,रा. कळमकरवाडी ता. पारनेर,असे मोटारसायकल चालवणाऱ्या मयताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर – पुणे द्रुतगती मार्गावर काल दिनांक १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मयत झरेकर हे आपल्या मोटारसायकल नंबर एमएच १६ ए झेड ०७६९ वरून शिरूर ते नगररोड घराकडे कळमकरवाडी पारनेर येथे जात असताना, गव्हाणवाडी शिवारात निघोज फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या व शिरूर कडून अ नगर जाणाऱ्या लक्झरी बस नंबर एम एच १९ वाय ३३७७ वरील चालकाने मोटारसायकल चालकास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.घडलेली ही घटना शिरूर पोलीस स्टेशन येथून ००/२०२० ने क्रमांकाणे टपालाने प्राप्त झाल्याने वगैरे मजकूरच्या खबरीवरुन मयत रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एम.के.कोळपे हे करत आहेत.या घटनेतील आरोपी सह लक्झरी बस बेलवंडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.