दिनांक ८ जानेवारी, श्रीगोंदा:
तालुका कार्यक्षेत्रात काम करत असलेल्या गॅस कंपनीच्या पाईप लाईनच्या कामात स्थानिक बेरोजगारांना व तालुक्यातील यंत्रणेला प्राधान्य द्यावे. अन्यथा, गॅस कंपनीचे काम बंद पाडू.! अशी पार्श्वभूमी देण्यासाठी काल दिनांक ७ जानेवारी रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर RPI मार्फत धरणे आंदोलन करण्यात आले.
कोरोना व ओमीक्रोनसारख्या साथ आजारात सामान्य पिचले असतांना, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्वसामान्यांना रोजगार देण्याऐवजी, तालुक्या बाहेरील वाहन, सामग्री, यंत्रणा, कर्मचारी व मजूर आणून खुलेआम गॅस कंपनी तालुक्यात काम करत आहे. या कृत्याने तालुक्यातील बेरोजगार तरुणांचा एक प्रकारे अवमान होत आहे.

या बाबीला केंद्रबिंदू माणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या श्रीगोंदा युनिटने जिल्हाध्यक्ष अविभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करत, श्रीगोंद्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईपर्यंत सदर आंदोलन तीव्र करणार असल्याचे माध्यमांना सांगितले.
तालुक्यातील स्थानिक कर्मचारी, यंत्रणेत जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर, ट्रक, हायवा इत्यादी वाहन समाविष्ट करावीत. तसेच, खोदकामामुळे होणारे ध्वनिप्रदूषण व वायु प्रदूषण अनं वृक्षतोड थांबवावी, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यावी, या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने सदर आंदोलनात सकारात्मक निर्णय घेण्यात आला. नमूद कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक जैन यांना आंदोलनस्थळी बोलविण्यात आले. आंदोलकांच्या भावना नमूद करण्यात आल्या. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेतो. असे लेखी पत्र जैन यांनी आंदोलकांना दिल्यानंतर सदरील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई न झाल्यास.? दोन दिवसानंतर तीव्र आंदोलन करणार असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनासमोर नमूद केले आहे. Positive response to RPI’s agitation for employment of locals .. Postponement of agitation after written assurance .. Otherwise ..!
आंदोलनाला नेते कालीदास जगताप, शिवसेनेचे (तालुकाध्यक्ष) बाळासाहेब दुतारे, काँग्रेसचे (जिल्हा युवकाध्यक्ष) स्मितल भैया वाबळे, ऑल इंडिया पँथर सेनेचे (जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, बापूसाहेब ओहोळ, प्रमोद मस्के, काँग्रेसचे आदिल शेख तसेच नायब तहसीलदार नेवसे व पोलीस उपनिरीक्षक तेजनकर सह विशाल घोडके, श्रीकांत घोडके, पप्पू घोडके, मानव जाधव, जितेंद्र पाडळे आंदोलनस्थळी उपस्थित होते.
स्त्रोत:(आंदोलन)
