दिनांक १२ सप्टेंबर(येळपणे/श्रीगोंदा):
श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील बहुतेक भागांबरोबर येळपणे, म्हसे, वडगाव शिंदोडी, पिंपळगाव पिसा, या ठिकाणी काल दिनांक ११ रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळ पासून या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडणार हे निश्चित होते.
दुपारी बरोबर दीड वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील नमूद भागात तर, श्रीगोंदा शहर आणि परिसरात रात्री ७ वाजनेच्या आसपास पावसाने जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. अत्यावश्यक सेवांसाठी घरा बाहेर पडलेल्या नागरिकांना मात्र, या अचानक पडलेल्या पावसामुळे, तेथेच थांबावे लागले.
या पावसामुळे बाजरी काढणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. तर, आधीच कोरोनाचे संकट असतांना शेतकरी वर्गाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पावसाचा कांदा नवीन लागवड, ज्वारी पेरणी, तरकारी, तसेच चालू असलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
स्रोत:(प्रमोद आहेर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
