श्रीगोंदा – ज्या कोरडवाहू शेतीत पोटापुरत धान्य पिकत नव्हते. अशा परिस्थितीत श्रीगोंदा शहराजवळील वेळू येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब डेबरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे बारा एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलविली आणि डेबरे परिवाराचे शेतीतून अर्थकारण बदलले आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांना डेबरे परिवराची डाळिंब शेती पायलेट प्रोजेक्ट ठरली आहे.
दिलीपराव डेबरे श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व नानासाहेब डेबरे हे खाजगी शिक्षण संस्थेत कामाला होते त्यामुळे वडिलोपार्जित २५ एकर क्षेत्रात ज्वारी तुर मुग मटकीचे पीक घेण्या पलीकडे विचारच केला जात नव्हता.
पाच वर्षांपूर्वी नानासाहेब डेबरे यांनी शिक्षण संस्थेतील क्लार्क पदाचा राजीनामा दिला आणि शेतीतज्ञ रमेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरडवाहू शेतीत डाळिंब लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला घरातील मंडळींनी विरोध केला. पण दिलीपराव डेबरे यांनी नानासाहेब यांना सपोर्ट केला आणि नानासाहेब यांनी सुरुवातीला दोन एकर डाळिंबाची लागवड केली. डाळिंब शेतीत चांगले पैसे मिळतात हे दिसताच डेबरे यांनी डाळिंब शेतीचे क्षेत्र १२ एकर पर्यंत वाढविले त्यासाठी सुमारे सुमारे एक एकराची दोन शेततळी केली दोन लिंबोणीच्या लागवड केली आहे.
डेबरे परिवारात १५ सदस्य आहेत. त्यापैकी दिलीपराव व नानासाहेब पदवीधर संदीपराव यांनी दहावीतून शाळा सोडली दिलीपराव यांची थोरली मुलगी सुप्रिया डॉक्टर झाली तर धाकटी मुलगी ऋतुजा एम.एस.सी. करते. मुलगा सचिन बी.एसी.अँग्री करत आहे.
शेती सुधारली म्हणुन मुलांच्या शिक्षणासाठी अर्थिक बळ मिळाले आणि डेबरे परिवारात श्रम, संस्काराबरोबर शिक्षणाची घौडदौड चांगल्या प्रकारे सुरू झाली आहे. दिलीपराव डेबरे यांची पत्नी अलका डेबरे यांनी डाळिंब शेतीत जातीने लक्ष दिले आहे त्यामुळे नाना डेबरे यांना मोठी मदत झाली आहे.
सध्या शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत अशा परिस्थितीत पिकांवरील उत्पादन खर्च कमी करून शेतीचे वैभव कायम टिकविण्यासाठी नानासाहेब डेबरे यांनी नियोजन केले आहे. भविष्यात पाच एकर क्षेत्रात सीताफळ लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लवकरच सीताफळाचा सुंगध दरवळणार आहे.
संदेश
मी नोकरीस सात / आठ हजार पगारावर काम करत होतो. पण या पगारावर माझे एकट्याचे भाग नव्हते. त्यामुळे आपण घरदार केव्हा कसे बांधणार असा प्रश्न होता. रमेश हिरवेंची एक दिवस भेट झाली. रमेश हिरवे यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा सल्ला दिला. जेष्ठ बंधू बाजार समितीचे सचिव दिलीपराव डेबरे यांनी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली. त्यामुळे हक्काचे भांडवल तयार झाले. सुरूवातीला दोन एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आणि जीवनातील नवी लढाई सुरू झाली पण डाळींब शेतीने माणसात बसविण्याचे काम केले. रमेश हिरवे सारखा देव माणुस भेटल्याने जीवनाचे चित्र बदलले आणि दिशा बदलली आहे. इतर तरुणांनी बदलत्या काळानुसार फळबागांची शेती केली तर निश्चितच जीवनात समृध्दी व आनंदाची बरसात होईल. नानासाहेब डेबरे वेळू
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
सदर माहिती पुस्तक प्रकाशन झालेल्या वेळेची आहे.
