२,४८,४७८/- रुपये किंमतीच्या अवैध देशी – विदेशी दारु साठयावर छापा.पती पत्नीस अटक..

दिनांक २२ मे(कोळगाव,श्रीगोंदा):

२,४८,४७८/ – रुपये किंमतीची अवैधरित्या देशी – विदेशी दारुच्या साठयावर छापा टाकुण सदर मुददेमाल जप्त करताना, सरकारी कामात अडथळा आणनारे पती पत्नीस मुददेमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, कोळगांव तालुका श्रीगोंदा येथील कारवाई .

सविस्तर माहिती अशी की, दिनांक २२ मे रोजी पोलीस निरीक्षक दिलीप पवार, (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना गोपनिय माहीती मिळाली कि, इसम नामे दिपक आबासाहेब नलगे हा कोळगांव फाटा ता. श्रीगोंदा येथील त्याचे निखील बिअर शॉपमध्ये त्याच्याकडे फक्त बिअर विक्रीचा परवाना असताना, त्यामध्ये तो देशी व विदेशी दारुची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करतो.तसेच,त्याचे राहते घरी भापकरवाडी रोड कोळगांव येथे मोठया प्रमाणात देशी – विदेशी दारुचा साठा करुन, सदर दारुची विक्री करत आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहीती नुसार पो.नि. / दिलीप पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ / विजयकुमार वेठेकर, पोना / रवींद्र कर्डीले, पोना / संतोष लोढे , पोना / सचिन आडबल , पोकॉ / प्रकाश वाघ, पोकॉ / संदिप दरंदले, रविंद्र चुंगासे, रोहीदास नवगीरे, संदीप चव्हाण, कमलेश पाथरुड, विनोद मासाळकर, रोहीत मिसाळ, सागर सुलाने, मपोकॉ / सोनाली साठे, सचिन कोळेकर संभाजी कोतकर, शिवाजी ढाकणे हे माहीती नुसार खात्री करुन कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करीता सरकारी व खाजगी वाहनाने रवाना झाले.

या पथकातील नमुद कर्मचारी यांनी सदर छाप्याकामी बेलवंडी पो. स्टे. चे पोसई / प्रकाश बोराडे , पोना / रावसाहेब शिंदे , पोकॉ / दादासाहेब क्षिरसागर, मपोकॉ / सुरेखा वलवे , मपोकॉ / विदया धावडे व दोन पंच यांना सोबत घेवुन निखील बिअर शॉपी येथे जावुन खात्री केली. तर, सदर ठिकाणी एक इसम निखील बिअर शॉपीमध्ये विदेशी दारुची विक्री करताना त्यांना मिळुन आला.त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने दिपक आबासाहेब नलगे वय -४२ रा.कोळगांव तालुका श्रीगोंदा असे नाव सांगीतले. यावेळेस ४९५३६ / – रुपये किंमतीची देशी व विदेशी दारु त्याचे बिअर शॉपीमधुन पंचासमक्ष पोलिसांनी जप्त केलीआहे.

त्यानंतर बातमीतील नमुद दुसरे ठिकाणी त्याचे राहते घरी भापकरवाडी रोड कोळगांव येथे खात्री करण्यासाठी पोलीस गेले असता, तेथे असलेल्या एका महीलेने पथकास घरात जाण्यास मज्जाव करुन सदर सरकारी कारवाईमध्ये अडथळा आणला. सोबत असलेली महीला पोलीस कर्मचारी हीस शिवीगाळ धक्काबुक्की केली.

संचीता दिपक नलगे वय – ३५ रा.कोळगांव तालुका श्रीगोंदा हीस पोलिसांनी ताब्यात घेवुन पंचा समक्ष घराची झडती घेतली असता, सदर ठिकाणी १९८९४२ / – रुपये किंमतीची देशी – विदेशी दारुचा साठा मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपी हे पती पत्नी असुन,त्यांचेकडुन एकुण २,४८,४७८ / रुपये किंमतीची देशी विदेशी दारु अवैध रित्या बाळगताना मिळुन आल्याने नमुद आरोपी यांना जप्त मुद्देमालासह बेलवंडी पो. स्टे. येथे हजर करुन पोकॉ / रवींद्र तुकाराम डुंगासे , नेम- स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजी.नं.आय १७७/२०२० भादवि कलम ३५३,५०४,५०६ , सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे .

सदरची कारवाई श्री. अखिलेश कुमार सिंह (पोलीस अधीक्षक, अहमदनगर), श्री. सागर पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर), श्री. संजय सातव , (उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत भाग कर्जत) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading