श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये पहिल्याच दिवशी जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली..

दिनांक २२ मे श्रीगोंदा:

तालुका महसूल विभागाचे प्रमुख कार्यालय असलेल्या तहसील कार्यालयामध्ये पहिल्याच दिवशी काही कर्मचारी अनुपस्थित राहत काही वेळेत उपस्थित नसल्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार तहसील कार्यालयातील कर्मचारी वागत नसल्याचे दिसून आले आहे.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी covid-19 च्या दरम्यान २२ मे रोजी पासून जिल्ह्यातील शासकीय कार्यालये १००% चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या असताना, पहिल्याच दिवशी दुपारी दोनच्या जेवणानंतर तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागात सुक सुकाट पाहण्यास मिळाला. कार्यालयात कोणी कर्मचारी नसतांनाही दिवे, पंखे चालू होते. याविषयी कामानिमित्त आलेल्या अनेकांनी याठिकाणी व्हिडिओ शूटिंग करून सामाजिक माध्यमांवर हा प्रकार व्हायरल केला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतीच सूचना करीत जिल्ह्यात शासकीय कार्यालय १००% चालू ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. आज दिनांक २२ मे रोजी सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के उपस्थिती दर्शवत आपल्या नियोजित कामावर रुजू होणे आवश्यक असताना. श्रीगोंद्यात मात्र, संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विशेषता दुपारी दोन वाजता जेवायला गेलेले काही कर्मचारी संध्याकाळी चार वाजले तरी कामावर उपस्थित नव्हते. शिवाय दुपारी दोन वाजता जाताना कार्यालयातील फॅन, ट्यूबलाइट, दिवे जसेच्या तसे चालू अवस्थेत चार वाजेपर्यंत कोणी नसतानाही चालूच होते.

अशा पद्धतीने बेजबाबदारपणे प्रशासकीय कर्मचारी जर काम करत असतील. तर, दरम्यान हे अनुपस्थित असताना, जर शासकीय दस्तावेज किंवा कागदपत्रां संदर्भात काही गैरप्रकार घडला. तर, यास जिम्मेदार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. तालुक्याचे तहसीलदार तथा इंसिडेंट कमांडर महेंद्र माळी हे कोरोना प्रादुर्भाव मध्ये तालुक्यामध्ये फिरत असतांना, त्यांच्यामागे त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी अशा पद्धतीने अनुपस्थित राहून किंवा बेजबाबदारपणे वेळेत उपस्थित न राहता कार्यालय जर वाऱ्यावर सोडत असतील. तर, मेहरबान साहेबांनी नमूद प्रकरणी गंभीरतेने लक्ष घालीत संबंधित प्रशासकीय यंत्रणेस सूचना देने गरजेचे आहे.

प्रहारचे पदाधिकारी नितीन रोही हे आपल्या नियोजित कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले असता, त्यांना हा प्रकार पाहण्यास मिळाला. त्यामुळे त्यांनी सर्व कार्यालयाचे त्यांच्या मोबाईलवर चित्रीकरण करीत, पत्रकारांना ही माहिती पुरवली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading