दिनांक ९ जुलै २०२५, श्रीगोंदा:
आदरणीय न्यायाधीश मा. एच. जे. पठाण यांच्या न्यायालयात चालविण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात, श्री. नांदलाल त्र्यंबक चव्हाण, रा. सोयगाव, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद यांना भारतीय चलनधोरण अधिनियम १८८१ मधील कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरणात तक्रारदार म्हणून कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळगाव पिसा, तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांनी दाद मागितली होती.
तक्रारदार संस्थेचे वतीने खटल्याचे कामकाज ॲड.पुरुषोत्तम जगन्नाथ फाटे यांनी पार पाडले. त्यांच्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने आरोपीस १ वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली.
तसेच, आरोपीस चेकच्या रकमेच्या दुप्पट म्हणजेच ₹७०००००/- (सात लाख रुपये) इतकी आर्थिक नुकसानभरपाई कुकडी साखर कारखान्यास अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर रक्कम न भरल्यास, आरोपीस २ महिन्यांची साधी कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.
या प्रकरणात श्री. संदीप अरुण कोठारे व श्री. तुषार मन्सिंग काकडे यांनी कुकडी साखर कारखान्याच्या वतीने महत्त्वपूर्ण काम पाहिले व खटल्याच्या यशस्वी कार्यवाहीत मोलाचे सहकार्य केले.
स्रोत:(निकाल दिनांक: ०८/०७/२०२५)





Advertise..
