महादजी शिंदे विद्यालयामध्ये फाली उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी…

दिनांक ७ मार्च(श्रीगोंदा):

कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर संशोधन करण्यासाठी या उपक्रमातुन प्रशिक्षण दिले जाते. नमूद अभ्यास गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यालयात निर्माण करण्यात आलेले शेडनेट मध्ये प्रत्यक्ष कृती करून संशोधन करण्यात येते. आत्तापर्यंत राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन करून ठसा उमटवला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश ढवळे, केंद्रप्रमुख गजानन ढवळे, विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे, उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत तसेच फाली विभाग प्रमुख शिवाजी थिटे, किशोर सोलाट व गुरुकुल प्रमुख विलास लबडे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

स्रोत:(सचिन झगडे,सर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading