दिनांक २३ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
बहुजन क्रांती सेनेची आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी वामनभाऊ भदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे उद्दिष्ट बहुजन, ओबीसी, वंचित घटक, शेतकरी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यावर केंद्रित असल्याचे सांगितले.

श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासनातील भ्रष्टाचार, तहसील कार्यालयातील अपुऱ्या सुविधा, अवैध व्यवसायांचे वाढते प्रमाण, आणि पोलिस यंत्रणेची निष्क्रियता यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांना पाण्याची असलेली टंचाई, सार्वजनिक बांधकाम विभागातील अनियमितता, आणि वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे निर्माण झालेली भीती यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमात बहुजन क्रांती सेनेचे राज्य उपाध्यक्ष सावता भाऊ शेठ, सरचिटणीस शिवाजी राऊत, राज्यसचिव राजेंद्र कोथिंबिरे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत नव्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते डोके सर व शिक्षण क्षेत्रातील धेंडे सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शिवाजी राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानत, बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात संघर्ष उभा करण्याचे आवाहन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…
