रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी ‘फिरते पथक’ योजना मंजूर..

दिनांक १४ मे २०२५, मुंबई:

राज्यात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ योजना नियमितपणे राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबईसह २९ महानगरपालिकांमध्ये ३१ फिरती पथके सुरू होणार आहेत.

बाल स्नेही व्हॅनमधून समुपदेशक, शिक्षक व महिला कर्मचाऱ्यांची टीम मुलांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षण, आरोग्य व संरक्षण सेवा देणार आहे.

योजनेतून दरमहा किमान २०% मुलांना शाळेत दाखल करणे बंधनकारक आहे.

बालहक्कांसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या या योजनेचा विस्तार पुढील टप्प्यात राज्यभर केला जाणार आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading