दिनांक २० डिसेंबर(बेलवंडी,श्रीगोंदा):
येथे चोरट्यांनी घरातील किचन दरवाजाचे कडी, कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन, चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेेले आहे.

माहिती अशी की, दिनांक १९ डिसेंबर रोजी बेलवंडी गावात प्रिती सागर इथापे (वय २७, रा.बेलवंडी, ता.श्रीगोंदा) यांच्या घराचे किचन दरवाजचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चाकुचा धाक दाखवुन घरामधील सामानाची उचका पाचक करुन कपाटातील रोख रक्कम, दागिने, मोबाईल तसेच प्रिती इथापे यांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन नेले. यामध्ये सोन्याचे, चांदिचे दागिने, मोबाईल असा सुमारे एक लाख ९९ हजार रुयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे.
प्रिती सागर इथापे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोन इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास स. फौ. सुरवसे करीत आहे.
स्रोत:(पोलीस ठाण्यात दाखल तक्रार)
