दिनांक २० डिसेंबर, श्रीगोंदा:
केंद्र शासन पुरस्कृत नाबार्ड अंतर्गत दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. ऑप. बँक लि. अहमदनगर चे संचालक मंडळ यांनी घेतलेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे शेतकरी सभासदांकारिता अल्प मुदत, पशुपालन, पक्षीपालन, मत्सपालन या व्यवसायाकरिता खेळते भांडवली कर्जाचे धोरणाच्या प्रसिद्धीबाबत बँकेचे संचालक दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांची तालुक्यातील सर्व सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक मंडळ, सचिव व बँक कर्मचारी यांची एकत्रित सभा व महिला स्वयंसहायता बचत गट मेळावा बँकेच्या श्रीगोंदा शाखेत संपन्न झाली.

या प्रसंगी बँकेचे संचालक दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्या समवेत बाळासाहेब नाहाटा, हरिदास(आबा) शिर्के, रोहिदास पवार, नगसेवक राजकुमार लोखंडे, शहाजी खेतमाळीस, गुलाबराव वाळूज, शरदराव जमदाडे, एम. टी. दरेकर सर, झुंबरराव दरेकर, गंगाराम मचे, राजेंद्र आबा म्हस्के, टिळक भोस, रंगनाथ बिबे व महिला बचत गटाच्या प्रतिनिधी अलकाताई नहार, पूनमताई लांडे, शितलताई कोथिंबीरे, राजाश्रीताई अरणकल्ले, वैशालीताई शिंदे आदी मान्यवर व सेवा संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संस्था संचालक, ठराव प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पानसरे यांनी सांगितले कि, कोविड विषाणू – १९ प्रदुर्भावाच्या मदतीसाठी बँकेने घेतलेल्या कर्ज धोरणानुसार शेतकरी सभासदांना अल्प मुदत खेळते भांडवली कर्ज ७ % दराने उपलब्ध होत आहेत. नियमित परतफेड कर्जदारांना केंद्र शासनाचा ३ % व्याज अनुदानाचा लाभ होणार आहे. तसेच, बँकेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना अल्प व्याजदराने अनुदानित कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना आपत्ती काळात नेहमीप्रमाणेच बँकेने मदतीचा हात पुढे केलेला आहे. बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. असे मनोगत बँकेचे संचालक दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी व्यक्त केले.
या निर्णयाबाबत जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद आनंदी व उत्साही असून, बँकेच्या या कर्जधोरणास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी पानसरे यांचे बँकचे संचालक पदाचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून, कौतुक केले. तसेच, पशुपालन खेळते भांडवली कर्जाची कर्जमंजुरीची मुदत दि. ३१/१२/२०२० पर्यंत आहे. ज्या संस्थांनी आजपोवेतो कर्जमंजुरी घेऊन कर्ज वितरण केले आहे. त्या सर्व संस्था व सभासदांचे पानसरे यांनी कौतुक केले. ज्या संस्थांनी पशुपालन खेळते भांडवली कर्जाची कर्जमंजुरी अद्याप घेतलेली नाही.त्या संस्थांनी बँकेच्या कर्जधोरणानुसार दि. ३१/१२/२०२० पर्यंत कर्जमंजुरी घेऊन सेवा संस्थांच्या शेतकरी सभासदांना बँकेच्या कर्जधोरणाचा लाभ द्यावा असे जाहीर आव्हाहन केले.
तसेच सर्व शेतकरी सभासदांना सौजन्यशील वागणूक देणेबाबत बँक कर्मचारी व सचिव सेवक यांना सूचित केले. महिला बचत गट मेळाव्या प्रसंगी उपस्थित शेतकरी महिलांना त्यांचे धारण जमीन क्षेत्र व बँकेच्या कर्ज धोरणानुसार त्वरित पिककर्ज व पशुपालन खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देणार असून, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम व स्वावलंबी करणेसाठी नियमानुसार कर्जपुरवठा उपलब्ध करून देणार असलेचा मानस त्यांनी व्यक्त केला.
महिला प्रतिनिधी श्रीमती अलकाताई नहार, पूनमताई लांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अलकाताई यांनी तालुका पातळीवर बचत गट बँक स्थापन होणेबाबत विचार व्यक्त केले. पानसरे यांनी याबाबत अलकाताई नहार यांचे अध्यक्षतेखाली तालुका कार्यक्षेत्र असलेला बचत गट स्थापन करून तालुक्यातील सर्व महिला भगिनींना आर्थिक सहाय्य करणेबाबतची ग्वाही दिली.
याप्रसंगी तालुका बचत गटप्रमुख पवार उपस्थित होते. महिला मेळाव्यास महिला भागिनींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. तालुका विकास अधिकारी व्ही. बी. जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्रोत(प्रेसनोट)
