चिंभळ्यात जबरी चोरी,अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत वृद्धेच्या कान, छाती, पोट, पायांना गंभीर इजा..

दिनांक २० डिसेंबर(चिंभळा,श्रीगोंदा):

दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारास चिंभळे गाव शिवारातील घरात विमलबाई जाधव व त्यांचे पती माधव जाधव झोपले असतांना, अज्ञात तीन चोरट्यांनी घराची आतील कडी उघडुन, घरात प्रवेश करीत वृद्ध दाम्पत्यानां धाक दाखवुन गजाने मारहान केली. विमालबाईच्या गळ्यातील, कानातील, नाकातील सोन्याचे दागिने व पायातील जोडवे जबरीने काढुन चोरुन नेले आहेत. याबाबत मोहन माधव जाधव या पीडितांच्या मुलाने फिर्याद दिली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

परंतु, सदरचा प्रकार हा चोरीचा वाटत नसल्याचे त्यांचे म्हणणे असून, जमिनीच्या वादामुळे फिर्यादीचे आई, वडील त्या क्षेत्रामध्ये पुर्वीपासुन वस्ती करुन राहतात. त्यांनी ते वादाचे क्षेत्र सोडुन निघुन जावे. या हेतुने शरद किसन गदादे याने अन्य तीन इसमांच्या मदतीने आई वडीलांना भीती दाखविण्याच्या उद्देशाने जबरी चोरी केली असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यापुढे ही शरद किसन गदादे हा इसम ती जमिन खाली करण्यासाठी आम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. त्याचे सांगणेवरुन अनोळखी तीन इसमांनी सदरची जबरी चोरी केली आहे. असा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.

या घटनेत विमलबाई गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना छातीत, पोटात, कानांवर व पायांवर जबर दुखापत झाली आहे.

स्रोत(बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading