दिनांक २० डिसेंबर, श्रीगोंदा:
दि. २० ऑगस्ट २० रोजी विसापुर फाटा येथे जावेद घड्याळया चव्हाण वय ३५ वर्षे, रा. सुरेगाव ता.श्रीगोंदा याने व त्याचे इतर साथीदारांसह स्वस्तात सोने देतो म्हणुन, जळगाव जिल्ह्यातील पुरुष व महीलांना बोलावून सदर टोळीने त्यांच्यावर दरोडा टाकुन त्यांचेकडील ३,१५,०००/- रुपये त्यामध्ये रोख रुपये व सोन्याचे दागीने चोरुन नेले होते. त्याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशन भा.द.वि.क. ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सविस्तर माहिती अशी की, सदर दरोड्यात आरोपी जावेद याचे चार साथीदारांचा खुन झाला होता.तेव्हापासुन सदर आरोपी हा पोलिसांना गुंगारा देवुन फरार होता. दिनांक १९ डिसेंबर रोजी पोनि रामराव ढीकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी जावेद घड्याळ्या चव्हाण वय ३५ वर्ष, रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा हा सुरेगाव शिवारात असल्याची बातमी मिळालेवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवुन, त्यांना रवाना करुन कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील अट्टल आरोपी नामे जावेद घड्याळ्या चव्हाण वय ३५ वर्षे, रा.सुरेगाव ता. श्रीगोंदा, अशा चिंगळ्या काळे वय १९ वर्ष, रा. वांगदरी ता.श्रीगोंदा यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांचेकडे एक पैशन प्रो. कंपनीची मोटारसायकल मिळुन आली.
सदर बाबत विचारपुस केली असता, त्याने सदर मोटारसायकल ही यवत वरुन चोरी करुन आणल्याची कबुली दिली आहे. त्याबाबत यवत पोलीस स्टेशनला माहीती घेतली असता पुणे ग्रामिण यवत पोलीस स्टेशनला भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर आरोपीवर यापुर्वी गुन्हे दाखल असून, ते उघड होण्यास स्थानिक प्रशासनास मदत होणार आहे.
सदरची कारवाई (पोलीस अधिक्षक) मनोज पाटील, (अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल, (उपविभागीय पोलीस अधिकारी) अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) रामराव ठिकले, (सपोनि दिलीप) तेजनकर, (पोहेकॉ) अंकुश ढवळे, (पोको) प्रकाश मांडगे, (पोकों) संजय काळे, (पोकॉ) गोकुळ इंगवले, (पोकाँ) दादा टाके, (पोकॉ) किरण बोराडे , (मपोकॉ) लता पुराणे यांनी केली आहे.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीसांची प्रेसनोट)
