चंदन चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात..

दिनांक २१ ऑगस्ट(टाकळी लोणार,श्रीगोंदा):

पोलिसांनी आज तालुक्यातील टाकळी लोणार गावच्या शिवारात बापूसाहेब फंड यांच्या शेतातून १५ किलो वजनाचे ४५ हजार रुपये किंमतीचे चंदन चोरणाऱ्या विलास हिरामण गायकवाड व संदीप पोपट पवार दोघे (रा. चिंचणी ता. शिरूर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. बापूसाहेब फंड यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात चंदन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापूसाहेब फंड यांच्या टाकळीलोणार येथील शेताच्या बांधावर चंदनाची दोन मोठी झाडे आहेत. आज (दि. २१) रोजी फंड त्यांच्या शेतात गेले असता, त्यांना ही चंदनाची झाडे दिसली नाहीत. जवळ जाऊन पाहिले असता,नमूद दोघांनी चंदनाचे झाड तोडल्याचे निदर्शनास आले.

याबाबत फंड यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस येण्याचा सुगावा लागताच या दोन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीगोंदा सहायक पो.नि.राजेंद्र सानप, पो.कॉ. योगेश सुपेकर,पो.कॉ. किरण जाधव यांनी पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आहे.यात चोरलेले चंदन पोलिसांमार्फत जप्त करण्यात आले आहे.

स्रोत:(दादा सोनवणे यांच्या कडून मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading