दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील नामांकित ॲड.महेंद्र शिंदे यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर आपले नामनिर्देशन पत्र आज दाखल केले. त्यांच्या उमेदवारीमुळे श्रीगोंदा तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, “सामाजिक अस्थिरता आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याची आवश्यकता आहे.”
श्रीगोंदा तालुक्यातील जनकल्याणाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, सामाजिक न्यायाची गती वाढावी आणि घटनेबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने ॲड. शिंदे यांनी बहुजन समाज पक्षाच्या वतीने उमेदवारी निश्चित केली आहे. त्यांच्यासोबत बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी एबी फॉर्मच्या पूर्ततेसाठी ओहोळ यांनी पुढाकार घेतला.
आजच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान सुनील ओहोळ, विठ्ठल मस्के, भीमराव घोडके, नितीन जावळे, कचरू वायकर, अंबादास घोडके, आबासाहेब रामफळे, आकाश माने, राहुल हिरभगत, स्वप्निल पवार, रोहित साळवे, दीपक काळे, ॲड.वसंत शिंदे, अनिल चव्हाण, हौसराव गोरे यांसारखे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(अधीकृत माहिती)




