अण्णासाहेब शेलार यांचा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल: “साखर विरुद्ध भाकर” म्हणत निवडणुकीची सुरूवात..

दिनांक २८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील विविध राजकीय संघटनांचे पदाधिकारी आज आपले उमेदवारी अर्ज अर्थात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

अण्णासाहेब शेलार यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले व त्यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन सर्वसामान्य घटकांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अण्णासाहेब शेलार यांनी यावेळी “साखर विरुद्ध भाकर” अशी निवडणूक होईल, अशी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीच्या प्रक्रियेतील अनुभवांचा उल्लेख करताना त्यांनी “पंधरा खोके” आणि रॅलीसाठी रोजंदारीवर मानसे गोळा करणाऱ्यांवर टीका केली. सामान्यांच्या प्रमुख समस्यांवर, जसे की बेरोजगारी, साकळाई सिंचन योजना, व एमआयडीसीच्या मुद्दासाठी व्यापक लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नामनिर्देशन पत्र दाखल करताना सामाजिक कार्यकर्ते ॲड. अरुण जाधव, योगेश साठे, संतोष जौंजाळ सह विविध समाजाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

स्रोत:(अधीकृत माहिती)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading