श्रीगोंदा, दिनांक २८ ऑक्टोबर २०२४:
शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेले, दलित आदिवासी, शेतकरी, कष्टकरी व उपेक्षित बांधवांच्या न्यायासाठी सतत झटणारे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राहुल छत्तीसे यांनी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी संघटनेचे प्रतिनिधी आणि चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना राहुल छत्तीसे यांनी सांगितले की, “सामान्य माणूस जो सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक स्तरावर पिचलेला व दुर्लक्षित आहे, त्याला संविधानिक अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी करीत आहे.” श्रीगोंदा मतदारसंघात अनेक कालखंडापासून प्रस्थापित आणि कारखानदारांचे वर्चस्व असल्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या सामान्य नागरिकाला अनेक योजनांचा लाभ मिळत नाही, हे लक्षात घेऊन आम्ही या उमेदवारीचा निर्णय घेतला आहे.
छत्तीसे पुढे म्हणाले की, “महापुरुषांचे विचार, पक्षाचे ध्येह धोरण, आणि संविधानातील तरतुदी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. यापुढेही जनतेच्या हक्कासाठी आम्ही कार्यरत राहणार असून, सामाजिक न्याय व समानतेच्या लढ्यात पक्ष कटिबद्ध राहील. आगामी काळातही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडणार आहोत.”
नामनिर्देशन पत्र दाखल करताना ॲड. प्रकाश लोंढे, गोरक्षनाथ साबळे, संदिप ओहोळ, सागर छत्तीसे, सुरज छत्तीसे, सचिन गंगावणे, योगेश शिंदे, किरण उबाळे, शरद ढोणे, राहुल घोडके आणि शरद साबळे यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(स्रोत: अधिकृत माहिती)




