श्रीगोंदा अलर्ट: भेसळयुक्त आणि निकृष्ट दुधाविरोधात मोठी कारवाई; दोन डेअरींमधून हजारो रुपयांचे दूध जप्त!

दिनांक ११ जुलै २०२६ श्रीगोंदा:

तालुक्यातील दूध उत्पादक आणि ग्राहकांसाठी एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुग्ध व्यवसायांवर मोठी कारवाई केली आहे. आरोग्याशी खेळणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या दुधाची साठवणूक करणाऱ्या दोन प्रमुख मिल्क प्रॉडक्ट्सवर छापे टाकून हजारो रुपयांचे दूध जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान दुधाची साठवणूक अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले, तसेच हे दूध मानवी आरोग्यासाठी घातक आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आल्याने ते जागेवरच जप्त करण्यात आले.

  • सिद्धेश्वर मिल्क प्रॉडक्ट्स: येथे टाकलेल्या छाप्यात ४ हजार ४८४ रुपये किमतीचे ११८ लिटर गायीचे दूध जप्त करण्यात आले.
  • शिवामृत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स: या ठिकाणी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल ४८ हजार २१६ रुपये किमतीचे १ हजार १४८ लिटर गायीचे दूध निकृष्ट दर्जाच्या संशयावरून जप्त करण्यात आले.

या कारवाईमुळे तालुक्यात निकृष्ट आणि भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनी आणि ग्राहकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेत दुधाची खरेदी करताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाकडून या दोन्ही उत्पादकांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

स्तोत :(ओनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading