श्रीगोंदा कोरोना update (दि.१६ जुलै)..

दिनांक १६ जुलै,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. आज घोगरगाव, बेलवंडी बुद्रुक, गार, अजनुज, घारगाव, घोटवी, आणि श्रीगोंदा शहरातील मुंजोबा चौक येथे कोरोना रुग्ण आढळल्याने सदर गावे व परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समिती श्रीगोंदा येथील एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याने पंचायत समिती कार्यालय ३ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोना संदर्भातील प्रशासनाचे निकष पाळवेत असे आवाहन श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.

स्रोत: (श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading