#श्रीगोंदा… त्या रात्री झोपेत युवकासोबत घडले असे की..! सारे चकित झाले..?

दिनांक २६ जुलै, श्रीगोंदा:

तालुक्यातील मांडवगण येथे स्वतःच्या घराच्या बांधकामात व्यस्त असलेले एक कुटुंब त्या रात्री नवीन बांधकामा शेजारी छपरात घरातील ज्येष्ठ मंडळी झोपली असतांना, किरण शेटे हा २४ वर्षीय युवक नवीन स्लॅबवर झोपला होता. मात्र, त्याच्यासोबत मध्यरात्री असे घडले की, युवकासह त्याचे घरचेही चकित झाले. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद देत, घडलेला प्रकार युवकाने कळविला आहे.

या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, किरण मीठु शेटे हा २४ वर्षीय युवक मांडवगण गावात गॅरेज व्यवसाय करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. त्याने नुकतेच नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे. नवीन बांधकामामुळे घरातील सर्व शेजारी छपरामध्ये तात्पुरते वास्तव्यास आहेत.

दिनांक २२ जुलैच्या रात्री कुटुंबातील सर्व लोक जेवन करून बांधकाम शेजारील छपरामध्ये झोपले. किरण हा बांधकामाच्या स्लॅबवर झोपला. त्यावेळी गाढ झोपेत असतांना त्याने उशाखाली ठेवलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल व पाकीट ज्यात १५ हजार रुपये होते. ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवल्याचा प्रकार घडला. मध्यरात्री किरणला जाग आल्यानंतर सदर प्रकार त्याच्या ध्यानात आला. यावर त्याने वडील व घरच्या लोकांना आवाज देत, घडलेला प्रकार सांगितला. स्लॅबवर चढून उश्या खालील मोबाईल व पाकीट चोरी झाल्याने किरण सह त्याचे घरातील मात्र चकित झाले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत किरण शेटे याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shrigonda … It happened to a young man in his sleep that night ..! Everyone was shocked ..?

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे ओप्पो कंपनीचा एफ १९ मॉडेलचा मोबाईल ज्याची किंमत पंधरा हजार रुपये आहे. तर, पाकीटा मधील आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम सह पाचशे रुपयांच्या ३० नोटा असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याचे किरणने फिर्यादीत नमूद केले आहे.

स्त्रोत: (दिनांक २२ जुलै रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading