#श्रीगोंदा.. तू माझ्यासोबत चल.. नाहीतर, तुला गायब करील..! अश्लील भाषा वापरत गावगुंडाकडून विवाहितेस मारहाण..

दिनांक २३ जुलै, श्रीगोंदा:

तालुक्यातील घुगलवडगाव गावात २७ वर्षीय विवाहितेस अश्लील अपशब्द वापरत उचलून नेण्याची भाषा येथील एका नराधमाने केली आहे. तू माझ्यासोबत चल.. नाहीतर, तुला गायब करील..! अशा प्रकारची धमकी देत, अश्लील भाषा वापरून मारहाण करीत, महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार नमूद ठिकाणी घडला आहे.

याबाबत पीडित महिलेने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दारुड्या इसमाविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shrigonda .. you come with me .. otherwise, you will disappear ..! Married woman beaten by village goons using obscene language ..

सविस्तर वृत्त असे की, नमूद इसमास दारू पिण्याचे व्यसन आहे. विवाहित महिलेचा पती चालत असल्याने तो नेहमी कामानिमित्त बाहेर गावी असतो. याचा गैरफायदा घेत, त्या इसमाने महिलेस वारंवार छेडण्याचा प्रयत्न केला. तिला पाहून अश्लील शिवीगाळ करणे, वाईट भावनेने तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करणे, वेळोवेळी फोन करून त्रास देणे. अशा पद्धतीने तो या महिलेस छळत होता.

दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास महिला शेतात काम करत असतांना, हा इसम वाईट भावनेने पाठलाग करत तिथे आला. तू माझ्यासोबत चल असे म्हणाला. महिलेने त्यास नकार दिला. यावर राग अनावर होऊन त्या महिलेला त्याने अश्लील शिवीगाळ करीत, तू माझ्या सोबत चल. नाहीतर, तुला गायब करील. अशी धमकी दिली. तसेच, महिलेच्या केसाला धरून तिला खाली पाडून काठीने मारहाण केली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या घटनेनंतर महिलेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भाऊसाहेब दांगडे याच्या विरुद्ध भादवि कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ड) ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

स्त्रोत: (दिनांक २१ जुलै रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading