श्रीगोंदयात महिलेचा विनयभंग.. दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी मार्फत पीडीतांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न..! श्रीगोंदा पोलिस पीडित कुटुंबाला संरक्षण देणार का.?
दिनांक १३ जानेवारी, श्रीगोंदा:
तालुक्यातील वलघुड येथील एका मागासवर्गीय महिलेला मारहाण करून, जातीवाचक शिवीगाळ करत तिच्या पतीसह कुटुंबाला जेसीबीने पुरून टाकण्याची भाषा करण्यात आलेली आहे. याबाबत काल श्रीगोंदा पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास सांडपाण्याच्या किरकोळ कारणावरून दिनेश ढवरे या मातंग समाजाच्या इसमाला शेजारी राहत असलेल्या, आबासाहेब गणपत टकले याने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केलीय. पतीला मारहाण होत असतांना, दिनेश ढवरे यांच्या पत्नी सोडवण्यासाठी गेल्या असता, त्यांनाही टकले याने हाताला धरून ओढत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून, मारहाण केली. जेसीबीने खड्डा करून, तुम्हाला गाडून टाकीन..! अशी धमकी दिली.

यानंतर काल दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आबासाहेब गणपत टकले याचे विरुद्ध भादवि कलम ३२३, ३५४, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(आय), ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यू) (आयआय) व ३(२)(व्हीए) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नमूद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासही विलंब झाल्याचे समजते आहे. तर, गुन्हा दाखल होऊ नये. यासाठी पण काही सवर्ण पुढारी पोलिसांवर दबाव टाकत होते. त्याच बरोबर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ढवरे कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याची माहिती मिळाली आहे. साधारण वीस-पंचवीस लोकांचा जमाव आमच्या घरी येऊन, वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत पीडित महिला व तिच्या मुलाने माध्यमांशी वार्तालाप केला आहे.
या ठिकाणी पिडीतांवर अशा पद्धतीने गैरसंविधानिक जमाव दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतांना, पोलीस प्रशासन हा विषय गंभीरतेने हाताळताना दिसत नाही. अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अत्याचारग्रस्त कुटुंबाला संरक्षण देण्याऐवजी, ढवरे कुटुंबीयांना पोलीस यंत्रणा कोणाच्या सांगण्यावरून दुर्लक्षित करीत आहे.? हा सवाल उपस्थित होत आहे.!
स्त्रोत:(फिर्याद)
