दिनांक १२ जानेवारी, श्रीगोंदा:
तालुक्यातील काष्टी नजीक महिंद्रा मॅक्सिमो कंपनीच्या मिनी ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट चारीत जाऊन उलटला. मात्र, सुदैवाने चालकाला गंभीर दुखापत झालेली नाही. काल दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

श्रीगोंद्यावरून काष्टीच्या दिशेने चाललेला मिनी ट्रक द्रुतगती मार्गावरून बाजूला हटून थेट चारी मध्ये जाऊन पलटला. यातील ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते आहे.

या द्रुतगती मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. श्रीगोंदा – काष्टी तसेच दौंड – नगर या द्रुतगती मार्गांवर मागील महिन्यापासून नववर्षाच्या सुरुवातीपर्यंत किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होत, साधारण दुखापतीसह काहींना आपल्या प्राणांना मुकावे लागलेले आहे.
स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
