श्रीगोंदयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे कामादरम्यान खाजगी पाहुणचाराला जाणे बनला चर्चेचा विषय..!

दिनांक १४ जानेवारी, श्रीगोंदा:

जिल्ह्यातील दोन पोलीस स्टेशनचे कामकाज परीक्षण करण्यासाठी नाशिक व नगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्यातील दप्तर तपासणी व इतर सर्व बाबींची पाहणी झाल्यानंतर साहेब थेट एका खाजगी पाहुणचाराला उपस्थित राहिल्याने शहरात उपरोधक चर्चा झाली.

नमूद वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रात आल्यानंतर नेमके इन्स्पेक्शनसाठी आले की..? तालुक्यातील राजकारणी मंडळींना भेटत त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी.? असेही काहींनी या भेटीबाबत म्हटले आहे. राजकिय पदाधिकारी एवढ्यावरच शांत राहिले नाहीत. तर, या अधिकाऱ्यांचे सन्मान केलेले फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल करून टाकले.

साहेबांच्या भेटीबद्दल दुमत नाही. मात्र, राजकारणी लोकांना भेटण्याऐवजी तालुक्यात काही वर्षांपूर्वी मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. ज्या प्रकरणांमुळे श्रीगोंदा तालुका राज्यासह देशात चर्चेत आला.. त्या आदिवासी महिलेच्या नग्न धिंड प्रकरणासह लिंपणगाव जळीत कांडातील पीडितांना न्याय मिळाला का.? की ते अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.? स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने त्यांना योग्य दिशा देत, कर्तव्याचे पालन केले का.? याबाबत चौकशी करत पीडितांना भेट दिली असती. तर, सामान्य, उपेक्षित, वंचितांप्रति प्रशासन व राज्य शासनाची जबाबदारी प्रकर्षाने जाणवली असती. अशी चर्चा काही लोकांमार्फत केल्याचे समोर आले.

स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading