महिलेचा विनयभंग: श्रीगोंद्यात अमोल पाचपुते विरुद्ध गुन्हा दाखल..

दिनांक २ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

जाहिरात…

तालुक्यातील एका गावात हॉटेल चालवणाऱ्या त्या महिलेने श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. २८ वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी दुपारी, ती हॉटेलमध्ये असताना, लघुशंकेसाठी गेल्यानंतर अमोल लक्ष्मण पाचपुते या व्यक्तीने तिच्यावर अश्लील टिप्पणी करत विनयभंग केला.

फिर्यादीत तिने सांगितले की, ती लघुशंकेसाठी गावातील एका पतसंस्थेच्या इमारतीतील सार्वजनिक बाथरुममध्ये गेली होती. तेव्हा अमोल पाचपुते हा व्यक्ती अचानक बाथरुमच्या दारावर आला आणि कडी दोन-तीन वेळा वाजवली. दरवाजा उघडल्यावर, पाचपुतेने पीडित महिलेला “तू मला आवडतेस” असे म्हणत “आय लव यू” असे कानाजवळ बोलले. या प्रकाराने घाबरलेली महिला त्वरित बाहेर पळाली. मात्र, पाचपुतेने तिचा पाठलाग करून तिचा हात धरला आणि तिच्या सोबत अश्लील कृत्य केले.

महिलेच्या ओरडण्यामुळे तिचे पती घटनास्थळी आले. पतीला पाहून पाचपुतेने महिलेच्या आणि तिच्या पतीच्या दिशेने घाणघाण शिवीगाळ केली व “तुम्ही गावात कसे राहता तेच बघतो” अशी धमकी दिली.

पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनने आरोपी अमोल लक्ष्मण पाचपुते याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास सुरू असून, या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

स्रोत: (फिर्याद)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading