दिनांक २६ जुलै, श्रीगोंदा:
तालुक्यातील भिंगाण गावात वास्तव्यास असलेल्या एका शेतकऱ्याच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला येथीलच एकाने अमिष दाखवत पळवुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मुलीच्या वडिलांनी फिर्याद देत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. In Shrigonda, a minor girl was abducted by showing amish! Filed a kidnapping case against one.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दिनांक २२ जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राहते घरून मुलीस शेजारी राहत असलेल्या एका इसमाने कशाचे तरी ? अमिष दाखवून पळवून नेले आहे.
तिचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेऊन ती आढळली नसल्याने, या घटनेबाबत तिच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भादवि कलम ३६३ नुसार भिंगाण येथील एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
स्त्रोत: (दिनांक २४ जुलै रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

