#श्रीगोंदा..लोणी व्यंकनाथ येथे सव्वादोन लाखांची वीज चोरी.गुन्हा दाखल..

दिनांक ७ फेब्रुवारी (लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदा):

लोणी व्यंकनाथ मध्ये सव्वादोन लाखांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात mseb च्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कार्यकारी अभियंता प्रदीप राधेश्याम सावंत यांच्या फिर्यादीवरून धर्मराज संपतराव काकडे, मोहम्मद सद्दाम, अमीर रज्जाक शेख (सर्व रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांच्यावर भारतीय विद्युत कायदा २००६ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील आरोपींनी वीज वापर होत असल्याची नोंद मीटरमध्ये होणार नाही, अशी व्यवस्था केली होती. त्याप्रमाणे त्यांनी ११ हजार २४२ युनिटची वीज चोरली. त्याची किंमत अधिभारासह दोन लाख २१ हजार २९० रुपये इतकी होत असल्याचे फिर्यादिमध्ये नमूद करण्यात आले आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२१ या कालखंडात ही वीजचोरी करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल तक्रार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading