दिनांक ७ फेब्रुवारी(अजनुज,श्रीगोंदा):
भीमा नदी पात्रात अजनुज गावामध्ये अनधिकृतरित्या वाळू उत्खनन करत असताना, ४ ब्रास वाळू व ट्रक मुद्देमालासह श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच, नमूद वाहतूक करणार्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दिनांक पाच फेब्रुवारी रोजी अजनुज पेडगाव रोड नजीक अनधिकृत पद्धतीने ट्रकचा वापर करून, कोणताही परवाना नसताना, भीमा नदी पात्रातून वाळू उत्खनन करीत ती चोरुन विक्री करण्याचे ऊद्देशाने वाहतुक करताना व पर्यावरणाचा -हास करताना मिळुन आल्याने. पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरुन सोमनाथ महादेव गिरमकर वय वर्ष ३५ राहणार अजनुज, तालुका श्रीगोंदा याच्यावर भादवि कलम ३७९ व पर्यावरण संरक्षण अधिनियम ३/१५ नुसार गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुकेशकुमार बडे (पोलीस नाईक) यांनी गुन्हा दाखल केला असून, प्रभारी पोलिस अधिकारी रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गट साहेब तपास करीत आहेत.
स्त्रोत:(श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल तक्रार)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
