श्रीगोंदा: बलात्कार प्रकरणातील आरोपी अमोल धर्माधिकारी अजूनही फरार; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह..!

श्रीगोंदा, २२ सप्टेंबर २०२५ –

श्रीगोंदा शहरासह तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या एका भटकी विमुक्त समाजातील महिलेवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी, अमोल धर्माधिकारी, अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता असे समोर आले आहे की, विवाहित महिलेवर बलात्कार आणि अत्याचार करणारा आरोपी अमोल कमलाकर धर्माधिकारी हा अजूनही पोलिसांच्या तावडीत आलेला नाही.

या आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी, आनंदकर मळ्यातील आरोपीच्या शेतात एका शेडमध्ये अमोल धर्माधिकारी याने पीडित महिलेला तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आणि लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमोल धर्माधिकारी हा श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध सुवर्णकार व्यापारी, धर्माधिकारी ज्वेलर्सचे संचालक कमलाकर धर्माधिकारी यांचा मुलगा असल्याने ही घटना तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.

धर्माधिकारी कुटुंब पैशाने धनदांडगे असल्याने, काहीजण असा संशय व्यक्त करत आहेत की, अमोल धर्माधिकारी याला अटकपूर्व जामीन मिळावा किंवा त्याला तुरुंगवासापासून वाचवण्यासाठी काही ‘अर्थपूर्ण’ व्यवहार पोलिसांसोबत केला गेला असावा.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading