श्रीगोंदा… तहसीलदार प्रदीप पवार यांची वाळू तस्करीवर कारवाई. २४ तासात २५ बोटी उध्वस्त..

दिनांक ९ मार्च (श्रीगोंदा):

श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांचे अधिपत्याखालील महसूल पथकाने सलग दोन दिवस अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई करत वडगाव शिंदोडी मधून ४ बोटी, म्हसे मधील ८ बोटी तसेच, माठ मधील १३ बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून नष्ट केल्या.

https://bit.ly/bspmycityshrigonda

तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांना सोमवारी वडगाव शिंदोडी, माठ, म्हसे परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समजले. त्यानुसार ते पथकासमवेत सदर परिसरात दाखल झाले व स्पीड बोटच्या सहाय्याने पाण्यात उतरून सलग सोमवार सायंकाळ पासून ते मंगळवार सांयकाळी अशी २४ तास कारवाई करत एकूण २५ बोटी उध्वस्त केल्या.

त्यामध्ये साधारण १ कोटी १० लाख रुपयांचे वाळूतस्करांचे नुकसान झाले आहे. सदर महसूल पथकात तहसीलदार यांचे सोबत मंडळ अधिकारी भरत चौधरी, प्रशांत कांबळे, शरद झावरे, अव्वल कारकून तलाठी शेलार, खताळ, व्हटकर, पोटे, ढगे, मिसाळ, मोरे, काशिकेदार, भांड व मापारी हे पथकात सामील होते. तसेच, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गुंड व कारखीले हे देखील पथकात सहभागी होते. भविष्यात देखील अश्याच प्रकारे कारवाई करून अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूकीला आळा घालणार असल्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी सांगितले.

स्रोत:(प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading