#श्रीगोंदा…चोरीस गेलेली ४ लाख ५० हजार रु.किंमतीची स्कॉर्पियो आरोपीसह पोलिसांच्या ताब्यात, श्रीगोंदा तपास पथकाची कामगिरी…

दिनांक ९ मार्च (श्रीगोंदा):

१४ डिसेंबर २०२० रोजी रात्री १२:०० वाजताचे सुमारास श्रीगोंदा शहरातुन एफ.जे.कार मल्टीसर्विस, गॅरेज, स्टेशन रोड श्रीगोंदा येथुन स्कॉर्पियो गाडी नं. एम.एच.१६. बी. एच. १६५३ चोरीस गेली होती. त्याबाबत फिर्यादी सचिन सुनिल शिंदे रा.आढळगाव ता.श्रीगोंदा यांनी महेंद्र बाजीराव महारनोर रा.वांगदरी याचेवर संशय असल्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सदर आरोपी महेंद्र बाजीराव महारनोर हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. दिनांक ८ मार्च रोजी श्री.रामराव ढिकले पोलिस निरीक्षक श्रीगोंदा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी महेन्द्र बाजीराव महारनोर हा ढोकराई फाटा श्रीगोंदा येथे एका चहाचे दुकानाचे समोर बसलेला आहे. त्यावरुन सदरची माहीती त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना देवुन सदर ठिकाणी जावुन आरोपी ताब्यात घेण्यास सांगितले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता, एक इसम चहाचे दुकानाचे समोर बसलेला दिसला. त्यास ताब्यात घेवुन नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव महेंद्र बाजीराव महारनोर रा.वांगदरी ता.श्रीगोंदा असे सांगितल्याने त्यास सदर गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस केली. तर, सदरची स्कॉर्पियो गाडी त्याने चोरी केली असल्याची कबुली दिल्याने, सुमारे चार लाख पन्नास हजार रुपये किंमतीची स्कॉर्पियो गाडी जप्त करण्यात आली आहे.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. आरोपी महेंद्र बाजीराव महारनोर याचे विरुध्द यापुर्वी पॉक्सो, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे विविध गुन्हे श्रीगोंदा, बेलवंडी, व पुणे ग्रामीण च्या शिरूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री मनोज पाटील सो, (पोलीस अधिक्षक अहमदनगर), मा.श्री सौरभकुमार अग्रवाल सो, (अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर), मा.श्री अण्णासाहेब जाधव सो, (उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत) यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे श्री. रामराव ढिकले (पोलीस निरीक्षक श्रीगोंदा), सपोनि दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ योगेश सुपेकर यांनी केली आहे.

स्रोत:(प्रसेनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading