दिनांक १० मार्च(लोणी व्यंकनाथ,श्रीगोंदा):
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण विकास केंद्र जामखेड आणि कोरा मुंबई व इकोनेट पुणे या संस्थे च्या वतीने श्रीगोंदा येथे चालू असलेल्या महिला समस्या निवारण केंद्र श्रीगोंदा च्या वतीने लोणी येथे महिला दिन साजरा केला. या महिला मेळाव्यासाठी प्रमुख आठ महिलांना कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते.
ज्या महिलांनी लहानपणापासून शिक्षणासाठी फार कष्ट सहन केले, लग्न झाल्यानंतरही शिक्षण चालूच ठेवले आणि त्यांनी जे स्वप्न पाहिले होते ते त्यांनी पूर्ण करून आज या महिला वकील, डॉक्टर, शिक्षिका, पोलीस, आणि समाजसेवेत कार्यरत आहेत. अशा संघर्षमय जीवन जगणार्या आणि भारताच्या संविधानामुळेच शिक्षण मिळालेल्या महिलांचा सत्कार भारताच्या संविधानातील उद्देशिका आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. कारण आदिवासी भटके विमुक्त समाजातील महिला कधीच त्यांच्या आयुष्यात विविध कार्यक्रम घेण्यासाठी व महिलांना संबोधित करण्यासाठी बाहेर येत नव्हत्या, सुशिक्षित महिला ज्यांनी नोकरी केली, ज्यांनी सत्ता भोगली अशा कोणत्याच महिला महिलांच्या अधिकारासाठी बाहेर येत नव्हत्या. कितीतरी दिवस अंधश्रद्धा रुढी- परंपरेत दडपून असलेल्या आणि येथील व्यवस्थेला बळी पडलेल्यानां समाजात कोणतेच स्थान नसणाऱ्या अशा सर्व महिलांनी एकत्र येऊन आजचा हा महिला दिवस साजरा केला.

म्हणूनच, समाजातील महिलांना प्रेरित करण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र या संस्थेने प्रशंसनीय सहभाग घेतला आहे. या संस्थे मुळेच आज महिला दिन घेण्याचं बळ महिलांना मिळाल आहे. ज्या महिलांकडून या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ मिळते अशाच सत्कारमूर्ती विजयश्री कदम, शेख मॅडम, काकडे मॅडम, भारती गावडे, निलोफर शेख, स्मिता सोनवणे, उर्मिला जठार आणि ज्याेती भोसले होत्या. म्हणूनच या सत्कारमूर्ती आपणास स्टेजवर दिसत आहेत. हे केवळ ग्रामीण विकास केंद्र संस्थेमुळेच शक्य झाले आहे. असे आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले.
आज भारताच्या संविधानामुळेच आम्ही सर्व महिला विविध पदे घेऊन या स्टेजवर उपस्थित आहोत आणि आज आपण संविधानाची उद्देशिका देऊन आमचा सत्कार केला, हा सत्कार अविस्मरणीय राहील. महिलांना पुरुषांपेक्षा कमी जास्त न मानता पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक द्या. असे विजयश्री कदम म्हणाल्या. तर, महिला ज्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यात गुंतून बसल्या आहेत त्या बंधनातून सोडवण्याचा आज आपण सर्व संकल्प करू असे ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ म्हणाले.
यावेळी लोणी व्यंकनाथ गावचे सरपंच रामदास ठोंबरे, ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब, आणि ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, संतोष भोसले, मनीषा काळे, छाया भोसले, पल्लवी शेलार, उज्वला मदने, आरती गोसावी, राजू भोसले, आसाराम काळे, संतोष जठार, गुड्डी चव्हाण उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया भोसले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा काळे यांनी केले. तर, आभार पल्लवी शेलार यांनी मानले.
स्रोत:(संतोष भोसले,जिल्हा समन्वयक,लोकाधिकार आंदोलन)
