सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

Savitrimai Phule: सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यामध्येच १० मार्च १८९७ मध्ये त्यांचे निधन झाले.

महिला, दलित समाजातील लोकांना अत्यचाराविरूद्ध आवाज उठवून शिक्षणाची कवाडं खुली करून देणार्‍यांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भरतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी जात, पात, लिंग भेद सारा मागे सारून मुलींना, महिलांना, विधवांना घराबाहेर पडून शिकण्याच्या संधी खुल्या करून दिल्या.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. ३ जानेवरी १८३१ साली सातार्‍याच्या नायगाव या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्म झाला. अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी ज्योतिबांसोबत लग्न केले. सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती. मात्र, घरातून विरोध असल्याने ज्योतिबांसोबत शेतीकाम करताना त्या शिक्षण घेत होत्या. ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांनी समाजसेवेचा वसा पुढे चालवला. १८९६ – ९७ दरम्यान पुण्यात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. हा जीवघेणा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला होता. मात्र, यामधून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार द्यायल्या पुढे सरसावल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यामध्येच १० मार्च १८९७ मध्ये त्यांचे निधन झाले.

सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन समता पत्र कडून भावपूर्ण श्रद्धांजली.. विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading