दिनांक ३ फेब्रुवारी २०२५, थिटेसांगवी, ता. श्रीगोंदा:
मौजे थिटेसांगवी परिसरात घोगरगाव ते निमगावकडे जाणाऱ्या मुख्य वीज वाहिनीवर ट्रान्सफॉर्मर जोडून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता सागर दयानंद शेळके यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मिरजगाव वीज वितरण कार्यालयाला लेखी तक्रार दिली आहे.

कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर वीज चोरी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, याबाबत चव्हाण साहेब (मो. नं. ८९५६९३….) यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

शेळके यांनी नमूद केले की, घोगरगाव वॉटर सप्लायजवळ तसेच आकडा टाकून वीज चोरी केली जात आहे. या वीजचोरीमुळे विद्युत वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे तसेच प्रामाणिक ग्राहकांना अनियमित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कारवाईची मागणी:
शेळके यांनी वितरण विभागाला विनंती केली आहे की, सदर वीज चोरी तातडीने रोखून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी त्यांनी संबंधित कार्यालयांना प्रत्यक्ष पाठवलेल्या अर्जात नाशिक विभागासह मिरजगाव, घोगरगाव, कर्जत, आणि अहिल्यानगर वीज वितरण कार्यालयांना प्रत सादर केल्या आहेत.

कार्यवाही होण्याची अपेक्षा:
या गंभीर प्रकरणात वितरण विभागाने त्वरीत लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा RTI कार्यकर्ते शेळके यांच्या सह परिसरातील नागरिकांकडूनही व्यक्त केली जात आहे.
स्रोत:(निवेदन)
