दिनांक ४ मे २०२६, अहिल्यानगर:
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकप्रिय ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘जनगणना २०२७ ची तयारी’ या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांच्याशी निवेदक राजेंद्र हुंजे यांनी सविस्तर संवाद साधला आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच, श्रोत्यांना ही मुलाखत ‘न्यूज ऑन एआयआर’ (News on AIR) या मोबाईल ॲपवरही ऐकता येणार आहे.
याशिवाय, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. ही मुलाखत महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध होणार आहे.
जनगणना २०२७ संदर्भातील तयारी, नियोजन आणि नागरिकांची भूमिका याबाबत महत्त्वपूर्ण माहिती या मुलाखतीतून उलगडणार असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्रोत:(dio)
