#श्रीगोंदा… भिमा नदि पात्रात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या इसमाचा मृत्यू..

दिनांक ५ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

राजेंद्र विठ्ठल एकशिंगे वय ५३ वर्ष धंदा शेती रा.अजनुज, श्रीगोंदा यांनी पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली की, दिनांक ५ एप्रिल  २०२४ रोजी रोजी सकाळी ७:०० वा.चे सुमारास आमचे गावातील अतिष शितोळे यांनी मला फोन करुन पुतण्या दुशंत हा रमेश कवडे रा.अजनुज ता.श्रीगोंदा यांचे अजनुज ता.श्रीगोंदा येथील शेत जमिनी शेजारील भिमा नदी पात्रात पडलेला आहे. तरी, तुम्ही सदर ठिकाणी जा असे कळविल्याने मी ताबडतोब सदर ठिकाणी जावुन खात्री केली.

तर, पुतण्या दुशंत सुहास एकशिंगे वय ३३ वर्ष रा. अजनुज ता.श्रीगोंदा हा बेशुध्द अवस्थेत भिमा नदी पात्रात पडलेला होता. पुतण्या दुशंत याची हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल नं.एम एच ४२ ए टी ८०२१ ही भिमा नदीचे डगरीला पडलेली होती. त्यानंतर आम्ही सदर बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीसांना कळवुन पोलीस सदर ठिकाणी आले नंतर पुतण्या दुशंत यास औषधोपचार कामी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे आणले. ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथील डॉक्टरांनी पुतण्या दुशंत यास तपासुन तो मयत झाले असले बाबत आम्हाला कळविले.

नमूद मयताचे नातेवाईकांनी दिलेल्या खबर नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार करीत आहेत. या घटनेबद्दल मयताचे संबंधितांचा संशय बळावला असल्याचे समजते आहे.

स्रोत:(खबर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading