अग्निपंख फाऊंडेशनचा ‘प्रेरणा उस्तव २०२४’ कार्यक्रम तहसिलदार, उद्योजक आणि एव्हरेस्ट वीर यांच्या उपस्थितीत संपन्न…

दिनांक ५ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

आज आयोजीत ‘प्रेरणा उस्तव २०२४’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपास्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार डॉ. क्षितिजा वाघमारे आणि माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या सुविधा कडलक यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षण अधिकारी अनिल शिंदे हे होते. सूत्रसंचालन पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले.

प्रस्ताविकात दिलीप काटे यांनी नमुद केले की,.. अग्निपंख फाऊंडेशनच्या उपक्रमांअंतर्गत एक मूठ अनथांसाठी कामं करणारे सर्व पदाधिकारी, सुविधा कडलक, तहसिलदार डॉ क्षितिजा वाघमारे, उद्योजक कुतवळ, बाळासाहेब काकडे, शिक्षवृंद, विद्यार्थी यांचे स्वागत करून अग्निपंख फाऊंडेशनचे कार्य नमूद केले. ज्या वंचिताला कोणी नाही.. त्यांना अग्निपंख फाऊंडेशन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्याला अन्न नाही.. त्या अनाथांना धान्य देण्याचे काम केले. आदर्श माता पुरस्कार, वंचितांना घरकुल आणि दुर्गम भागातील शाळांची निर्मिती.. असे परिपूर्ण झालेल्या उपक्रमांपैकी रायरेश्वर आवारात उभारलेल्या शाळेची चित्रफीत याठिकाणी दाखवण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ क्षितिजा वाघमारे तहसिलदार, प्रकाश कुतवळ, उद्योजक, अनिल शिंदे, गटशिक्षण अधिकारी, सुविधाताई कडलक माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या विरकन्या आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एक मुठ अनाथांसाठी देणाऱ्या शाळांचा येथे सन्मान करण्यात आला..

मनोगत:
समाजात वावरताना आपली माणसं आपल्या माणसांना मोठं करतात.. मात्र, अग्निपंख फाऊंडेशन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या मुलांना बळ देण्याचे काम करत आहे. त्यांचे अतुलनीय योगदान आहे. निस्वार्थ लोकं कमी आहेत. तुमच्यावर विश्वास आहे. आपली कामेचं आपल्याला भविष्यात जिवंत ठेवतात.. त्यामूळे महापुरुषांनी समाजासाठी केलेल्या कामांची स्मृती अखंड आठवात राहते..
प्रकाश कुतवळ

अवघड परस्थीतीत माऊंट एव्हरेस्ट सर केले.. कधीही कोणतेही स्वप्न पाहिले ते पुर्ण करायचेच.. हे मनाशी बाळगले होते. शिक्षणंच भेटत नसणारे लोकं ज्यावेळी देशासाठी काही करण्यासाठी सरसावतात त्यावेळी योग्य वेळापत्रानुसारच कार्य करावे लागते.. मला आर्मित जायचे होते. कंपनीत काम केलं.. पण मन रमत नव्हतं.. लग्नानंतर माझे स्वप्न पुर्ण करण्यास सुरुवात केली. एवरेस्ट सर करण्याचा प्रवास आणि अडी अडचणी आल्या.. येथे उपस्थित मुलं आमचे भविष्य आहेत. पुढे निसर्गाशी एकरूप झाल्याने अडचणी कमी झाल्या. या प्रवासात कॅम्प एक पर्यंत पोहचले. सहा तासांनी कॅम्प दोन पर्यंत पोहचले. कॅम्प तिन.. डेथ झोन आणि पुढील एव्हरेस्ट शिखर वाटचालीतील थरारक अनुभव आयुष्य बदलणारे होते.
सुविधा कडलक

कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिल्या बद्दल आयोजकांचे आभार. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सुविधाने एक प्रकारे जिवन संघर्ष केला आहे.  अग्निदिव्य पार करणाऱ्या सर्व उपस्थित यशस्वी अधिकाऱ्यांचे अभिनंदन. यशस्वी वाटचाल करण्याची जिद्द ठेवावी..
डॉ.क्षितिजा वाघमारे..

अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी करणारे शिक्षक या तालुक्यांत आहेत. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मदत करीत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. गुणवंत खेळाडू, समाजाला प्रेरणा ठरणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम अग्निपंख फाऊंडेशन करते आहे..
अध्यक्ष अनिल शिंदे..

यावेळी तालुक्यातील व शहरातील विद्यार्थी, पालकं, शिक्षकं, मान्यवरं आणि अग्निपंख फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading