#श्रीगोंदा रेप केस.. अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेचे ६ वर्ष शारीरिक शोषण.. धमकावून पैसेही उकळले..!

दिनांक ९ मे २०२४, श्रीगोंदा:

सन २०१८ ते दिनांक १४ जानेवारी २०२४ पर्यंत फिर्यादीचे राहते घरी यातील आरोपी सागर दशरथ काळे, रा.हंगेवाडी, ता.श्रीगोंदा याने त्याचे मोबाईल फोनमध्ये पीडितेचे काढलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच, फिर्यादीस जिवे ठार मारण्याची व फिर्यादीच्या बहिणीचे लग्न कसे होते..?  ते पाहुण घेतो..! अशी धमकी देवुन.

फिर्यादीचे राहते घरी तसेच, घायपतवाडी, ता.श्रीगोंदा येथील जंगलात व वरवंड, ता. दौंण्ड, जि.पुणे.., काष्टी, ता.श्रीगोंदा येथील लॉजवर..,  श्रीगोंदा येथील रॉयल कॅफे या ठिकाणी घेवुन जावुन, फिर्यादीशी जबरदस्तीने शरीर सबंध केल्याचे दिनांक ६ मे २०२४ रोजी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत नमुद केले आहे. फिर्यादी अल्पसंख्यांक समाजाची असून, तिचे अल्पवयीन असल्यापासुन शोषन होत असल्याचे यातुन स्पष्ट होत आहे.

त्याचे मोबाईल फोन मध्ये काढलेले पिडीत मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन, वेळोवेळी फिर्यादीकडुन रोख स्वरुपात तसेच, फोन पे वरुन पैसे घेतल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फीर्यादीवरुन आरोपी सागर काळे यांचे विरुद्ध भादवी कलम ३६६(अ), ३७६(२)(जे), ३७६(२)(एन), ३७६(२)(आय), ३८४, ५०६, ४५२, बाल लैगींक अपराधापासुन संरक्षण अधीनियम २०१२ चे कलम ३, ४, ५, ५(एल), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई समीर अभंग या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

स्रोत:(तक्रार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading