श्रीगोंद्यात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई..

दिनांक ९ मे २०२४, श्रीगोंदा:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ अहमदनगर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज शिवारात गोवाराज्य निर्मित व महाराष्ट्रात विक्री करण्यास प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारू विक्री करणाऱ्यास पकडुन दिनांक ७ मे रोजी मोठी कारवाई केली आहे.

यात उमेश दिगंबर गवळी रा.अजनुज ता श्रीगोंदा, बाळु रानबा गोडसे रा.टाकळी लोणार ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर या दोन आरोपीस अटक करण्यात आली आहे. मुद्देमालाची एकूण किंमत रुपये २,३६,२००/- (अक्षरी रुपये दोन लाख छत्तीस हजार दोनशे रुपये मात्र) इतके आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अहमदनगरचे अधीक्षक श्री प्रमोद सोनोने, उपाधीक्षक श्री प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक १ अहमदनगरचे निरीक्षक श्री सुरज कुसळे, दुय्यम निरीक्षक आनंद जावळे, सहाय्यक दुय्यम निरिक्षक व्ही एन रानमळकर, सर्वश्री जवान प्रविण साळवे, अविनाश कांबळे, महिला जवान शुभांगी आठरे यांनी केली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading