दिनांक १ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
शहराच्या पश्चिम भागात वास्तव्यास असणाऱ्या एका मागासवर्गीय शाळकरी मुलीला तिच्या दहावी परीक्षेच्या भूगोल पेपरच्या दिवशी, आरोपी आयान शेख याने पिस्तुलचा धाक दाखवून अपहरण करून पुण्यातील एका लॉजवर त्या मुलीच्या इच्छे विरूद्ध बलात्कार केला असल्याचे, पिडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अत्याचारित मुलीचे वय १६ वर्षे तर, आरोपी आयानचे वय साधारण २१ वर्षे आहे.
मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार.. दिनांक २६/०३/२०२४ रोजी ०९/३० वा.चे. सुमारास मी छत्रपती विद्यालय, बेलवंडी येथे पेपर देण्यासाठी शाळेचे गेटवर थांबलेले असताना, आमचे गावातील आयान इम्तियाज शेख धर्म मुस्लीम हा त्याचे मोटार सायकलवर आला व मला गाडीवर बस असे म्हणून, पिस्तुल दाखवुन, तु जर गाडीवर बसली नाही.. तर, तुला पिस्तुलने गोळ्या मारुन जिवच मारून टाकीन असा दम देवून, बळजबरीने त्याचेसोबत मोटारसायकलवर शिरुर येथे घेवुन गेला व तेथून पुणे येथे मला बसने घेवून जावून दिनांक २७/०३/२०२४ रोजी ०१/०० वा.चे. सुमारास पुणे येथील एका लॉजवर त्याने इच्छेविरुध्द माझेसोबत दमदाटी करुन शारिरीक संभोग केला असे नमूद केले आहे.
मुलीचा जबाब आणि तक्रारीनुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवी ३६३, ३७६, ५०६ नुसार अपहरण, बलात्कार, जीवे मारण्याची धमकी इत्यादी कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासुन संरक्षण कलम ३ व ४ पोक्सोसह अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(w), ३(२)(va) आणि आर्म ॲक्ट कलम ३/२५ नुसार आरोपी आयान शेख याचे विरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नमूद आरोपीस पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप विभागीय अधिकारी वाखारे करीत आहेत.
स्रोत:(फिर्यादीनुसार)
