श्रीगोंदा.. नगरसेवकाकडून विवाहितेचे लैंगिक शोषण..? पत्नी आणि नगरसेवकाच्या रासलीलेने पतीला हृदयविकाराचा झटका.! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डिलीट.?

दिनांक २९ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच, एका नगरसेवकाच्या कथित अनैतिक संबंधांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली, कारण पीडित विवाहितेच्या पतीने थेट रुग्णालयातून एक व्हिडिओ क्लिप सामाजिक माध्यमांवर (Social Media) व्हायरल केली.

या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या पत्नीसोबत त्या नगरसेवकाचे असलेले अनैतिक संबंध आणि त्यामुळे कुटुंबाला सोसावी लागलेली वेदना जाहीर केली. हे धक्कादायक कृत्य उघडकीस आल्यानंतर, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचेही समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार श्रीगोंदा शहरातील एका नगरसेवकाशी संबंधित आहे. पीडित महिलेच्या पतीने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की, संबंधित नगरसेवकाने त्यांच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले.  नगरसेवकाने “तू किती सुंदर दिसतेस,” “मी तुझ्यावर प्रेम करतो,” अशा शब्दांचा वापर करून पत्नीला भावनिकरित्या गुंतवले.

जेव्हा पत्नीला यातून बाहेर पडायचे होते, तेव्हा नगरसेवकाने तिला “मी तुझ्या घरी सांगेल” अशी धमकी दिली आणि तिला बाहेर पडू दिले नाही. घरी काही अडचण आल्यास “मी तुला सांभाळेल” असे आश्वासनही त्याने दिले. पत्नीने लेखी आश्वासन मागितल्यावर, त्याने तिला चक्क कोरा स्टँप पेपर दिला.

पतीला या अनैतिक संबंधांबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी नगरसेवकाच्या आकाला (जबाबदार व्यक्ती.. नेता..) याबाबत सूचना दिली. मात्र, त्यांच्या वर्तनात कोणताही फरक पडला नाही.

अखेरीस, या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने “तुला कोणाला सांगायचे ते सांग,” असे नगरसेवकाला सांगितले. यावर, त्या नगरसेवकाने हे प्रकरण थेट पीडितेच्या सासूला (म्हणजेच पतीच्या आईला) सांगितले.

https://amzn.to/4qwn1uO

शेवटी, जेव्हा पतीच्या आईने त्यांना या घटनेबद्दल सांगितले, तेव्हा हा धक्का सहन न झाल्याने त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. याच उपचारादरम्यान त्यांनी हा गंभीर प्रकार व्हिडिओद्वारे सार्वजनिक केला होता.

या व्हिडिओमध्ये पीडित पतीने नागरिकांना कळकळीची विनंती केली आहे की, “चांगल्या कपड्यांवर न जाता चांगल्या माणसांना निवडून द्या.” समाजसेवेच्या नावाखाली काही नराधम लोकांच्या प्रपंचात विष कालवण्याचे पातक करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.

हा संवेदनशील व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून डिलीट करण्यात आल्याचे दिसत आहे. नगरसेवक हे जबाबदार पद समाजसेवेसाठी असताना, एका लोकप्रतिनिधीने असे विचित्र आणि गैरवर्तन करणे, हे कायद्याच्या दृष्टीने तसेच नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात सत्यता आढळल्यास, संबंधित नगरसेवकावर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)

Leave a Reply