शंभर रुपये घे अनं माझ्यासोबत उसात चल.. मी तुला प्रेमाची भाषा शिकवतो..! म्हणतं अल्पवयीन मुलीचा विनयभंग.. गुन्हा दाखल.. श्रीगोंद्यातील घटना..

दिनांक ३ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यातील दुर्गम भागातील त्या गावात मागील आठवडा भरापूर्वी अपहरण आणि लैंगिक अत्याचाराच्या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. त्यानूसार बेलवंडी पोलिसांत भादवी कलम ३५४, ५०६, पोक्सो.. बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा कलम १२ व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम Atrocity च्या कलम ३(२)(va), ३(१)(i) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील आरोपी
विजय काळे राहणार म्हसे हा दिनांक १ एप्रिल रोजी दुपारी ४:०० वाजनेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना दारु पिउन मुलीचा हात धरुन, तीचे हातात बळजबरीने १००रु पैसे देत, हे पैसे खर्च करायला ठेव.. तु माझे सोबत उसात चल.. मी तुला प्रेमाची भाषा शिकवतो. असे बोलून मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे गैर वर्तन केले. यावरून नमूद गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भंडारे यांच्या सूचनेनुसार महिला पोलिस कर्मचारी काळे यांनी पिडीतेच्या वतीने तिच्या आईच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करीत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply